
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोची अनुप भारत कुमरे व वृषभ भास्कर कुमरे हे दोघेही दुचाकी कोची वरून खैरी कडे जात असताना खैरी गावाजवळ रोडच्या कडेला असलेल्या झाडावर वानराने दुचाकी समोर उडी घेतल्याने दुचाकीचा अपघात झाला असून अपघातात एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ मार्च २०२५ रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली आहे
अनुप भारत कुमरे व वृषभ भास्कर कुमरे हे दोघेही काही कामानिमित्त एम एच २९ ए झेड २४४१ या दुचाकीने वडकी कडे येत असताना खैरी गावाजवळ रोडच्या कडेला असलेल्या झाडावर वानराचा कळप होता या कळपातील वानराने दुचाकी समोर उडी घेतल्याने दुचाकी चालकाचे नियत्रंण सुटन दुचाकी पडून रोडवर दोघेही काही अंतरावर घासत गेले असून अनुप भारत कुमरे वृषभ भास्कर कुमरे हे दोघे गंभीर जखमी झाले य झालेल्या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना मिळताच तातडीने बीट जमादार अविनाश चिकराम यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले व घटनेचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी या दोघांनाही रुग्णालयात पाठविले मात्र रुग्णालयात जात असतानाच वाटेतच अनुप कुमरे याचा मृत्यू झाला तर एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पुढील तपास ठाणेदार सुखदेव बोरखडे हे करीत आहे