
वरोरा
वरोरा शहरापासूनपाच कि मी अंतरावर असलेल्या नंदोरी गावातील गौरव माधव हरणे वय15 वर्षे याचा विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.
गौरव हा जनावरांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे म्हणून शेतात तारेचे कुंपण करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाच्या काड्यासाठी सकाळी घरून निघाला सायंकाळ होऊनही मुलगा परत न आल्याने शोधाशोध सुरू झाला तेव्हा एका झाडावर विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत पावल्याचे आढळले,
.त्या नंतर गावकऱ्यांनी घटनस्थळी एकच गर्दी केली घटनास्थळी कुळाडी, वीला आढळून आला ही विद्युत वहिनी कर्नाटक एमटा कंपनीला जात असते, मृतकाच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे
