
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) आज दिनांक ११ऑगस्ट रविवारला विश्रामगृह राळेगांव येथे आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत राळेगाव विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटयाला मिळावा हि एकमताने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केली आहे.
राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा.
राळेगाव तालुक्यात 22 दिवसापासून सतत दार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकाचे नुकसान झाले त्या नुकसानीचे पीक विमा कंपनीने सर्वे करून शेतकऱ्यांना पिक विमा जाहीर करावा.
राळेगाव येथे एमआयडीसीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा.
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करण्यात यावी.
अशा पद्धतीचे निर्णय या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आले यावेळी राळेगाव तालुका अध्यक्ष दिलीप कन्नाके, शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, युवक तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, उपाध्यक्ष प्रवीण काकडे, तालुका सरचिटणीस गौतम तांगडे, महिला तालुकाध्यक्ष सौ . वंदनाताई काकडे, रमेश पेद्राम, कमलदास तिरणकर, विठ्ठलराव आवारी, गजानन सराटे, राजू गुजरकर,पराग मानकर, दिगंबर वडुळकर, विलास देशमुख, अंबादास उईके, नागोराव पोटफोडे, सलमान सय्यद, ज्ञानेश्वर भोयर, शिवदासजी राऊत, आनंद पिंपरे, प्रभाकर धोटे, भास्कर पराते, सुभाष येलेकर, अभिमान आडे, नागोराव कुमरे, गोपाल धनरे, अभिमान जुनघरे, सर्व युवक कार्यकारणी महिला कार्यकारणी तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.
