
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत प्रत्येक नागरिकासाठी आभा (ABHA) खातेक्रमांक तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. हा १४ अंकी अद्वितीय आरोग्य ओळख क्रमांक तुमच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित आणि एकत्र ठेवतो, तसेच विविध आरोग्य विषयक योजनांचा लाभ घेणे सुलभ करतो.
नोंदणी कशी करावी:
मोबाईलद्वारे:
वेबसाईटला भेट द्या – abha.abdm.gov.in
आधार क्रमांक व त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून आपला आभा क्रमांक तयार करा.
नोंदणी केंद्राद्वारे:
स्मार्टफोन नसल्यास, नजीकच्या नोंदणी केंद्रावर जाऊन नोंदणी करा.
का आवश्यक:
महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व इतर आरोग्य योजना वापरण्यासाठी
सर्व नागरिकांनी आपला ABHA क्रमांक तयार करून मोबाईलमध्ये सेव्ह करावा आणि जी. एम. सी. मध्ये मागितल्यास सादर करावा.
“प्रत्येक नागरिकाने आपला आभा कार्ड (ABHA खातेक्रमांक) त्वरीत तयार करून आपला मोबाईलमध्ये सेव्ह करावा.”
— डॉ. अनिल बत्रा, अधिष्ठाता
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ
