
सहसंपादक : रामभाऊ भोयर
झाडगाव येथील रमेश महादेव कुबडे (वय २८) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जुलै रोजी रात्री सुमारे ७ वाजता रमेश शेतातून जनावरे चारून घरी परतत असताना राळेगाव-वडकी हायवेवरील आपटीजवळील बेंबळा पुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बुलेरो पिकअप वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेशच्या डोक्याला, पाठीला व पायाला गंभीर दुखापत झाली होती.
त्याला तात्काळ राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांवगी-मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. सुमारे महिनाभर उपचार सुरू असताना अखेर १४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्याची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी रमेशचा भाऊ ओम कुबडे यांनी राळेगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून, अज्ञात बुलेरो पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
