
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ते डोंगरखर्डा मेटीखेडा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता आढळून येत असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालक यांचे जीव धोक्यात आले आहेत. सदर रस्त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणाने आणि अपारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुरुमाच्या वापरामुळे चिखल होत असून अपघातांना निमंत्रण देताना दिसते.
रस्त्याच्या खोदकामासाठी माजऱ्या मुरुम (लाल माती) वापरण्यात येत असून, पावसाळ्यात या मातीमुळे चिखल निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाणे धोकादायक ठरत आहे.
कुठेही सूचना फलक लावलेले नाही, माहिती नाही, या कामाच्या ठिकाणी कोणतीही माहितीफलक, अंदाजपत्रक किंवा संबंधित विभागाचे नाव दर्शविणारे संकेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे काम नेमके कोणत्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे, हे देखील अस्पष्ट आहे. ठेकेदार कंपनी ओबेराय कन्स्ट्रक्शन चे कर्मचारी नागरिक व पत्रकारांना कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे.
प्रशासन उदासीन, अपघातांचे प्रमाण वाढते याकडे आमदार, खासदार, मंत्री महोदय लोकप्रतिनिधी, व जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून कान्हाढोळा, नजरअंदाज होत असल्या चे दिसून येत
असून या कामात होत असलेल्या त्रुटींबाबत यापूर्वीही विविध माध्यमांतून आवाज उठवण्यात आला होता. मात्र, अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सध्या रस्त्यावर चिखल पडलेली असून, एका बाजूने रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे लहान वाहनांचे जाने अस्यक्य झाले असून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.मेटीखेडा-मोहदा कडे येणाऱ्या लोकांना झाडकिन्ही-किनवट मार्गाने पायपीट करीत जावे लागतं आहे
स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा रोष व्यक्त केला जात आहे. सदर रस्त्याचे काम नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ठरत असून, संबंधित विभागाने जिल्हाधिकारी साहेब व लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोषी कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
