
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना अंतर्गत भारतीय स्टेट बँक शाखा राळेगाव च्या वतीने पिंपरी (दुर्ग) येथील शरद कोवे यांना शाखा प्रबंधक वर्षा ओरके यांच्या उपस्थित दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
मृतक आरती शरद कोवे मु पिंपरी दुर्ग या महिलेचा मृत्यू १६ ऑगस्ट २०२४ ला आकस्मिक रोजी झाला होता. मृतक आरती कोवे या महिलेने हरीश गडदे यांचे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र राळेगाव यांचे कडे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत ४३६ रुपयाचा वार्षिक विमा काढला होता. मृतकचे पती शरद वसंतराव कोवे मु पिंपरी हे काही दिवसांनी मृत्यू चा दावा करण्याकरीता स्टेट बँक राळेगाव शाखेत माहिती करीता आले त्यांना मृत्यू दावाची सर्व कागदपत्र देण्यात आली परंतु स्टेट बँक चे सर्विस प्रबंधक यांनी त्यांना मृतकाचे जीवन ज्योती योजना मधे ४३६ रु वर्षाचे कपात करून असल्याचे दिसून आले तेव्हा याबाबत सर्विस प्रबंधक यांनी शरद कोवे यांना प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना ची क्लेम करायला सांगितले स्टेट बँक चे सर्विस प्रबंधक सीम गौरखेडे यांनी सर्व कागदपत्र घेऊन वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवले होते .त्यानंतर प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत क्लेम मंजूर होऊन दि. २६ डिसेंबर २०२५ ला २ लाख रुपये विमा मंजूर झाला असून आरती शरद कोवे यांचे वारस पती शरद वसंत कोवे याला व्याज सहित २००४२५/ रु चा धनादेश स्टेट बँक शाखा प्रबंधक वर्षा ओरके यांच्या उपस्थितीत देण्यात आला असून यावेळी उप शाखा प्रबंधक हर्षद नानोटी,सर्विस प्रबंधक सीम गौरखेडे,प्रकाश क्षीरसागर,चांदणी गोपाळ,वैभव भांडेकर,अपूर्व भोंगाडे,हरीश गडदे,अमोल माने,योगेश ढोले,सचिन भुरकुटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
