
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज 22 फेब्रुवारी 2025 रोजी चिंतन दिनानिमित्त सैनिक पब्लिक स्कूल, वडकी, राळेगाव येथे चिंतन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लॉर्ड बॅडेन पॉवेल आणि लेडी बॅडेन पॉवेल यांना पुष्प अर्पण करण्यात आले आणि श्री सत्यसाई बहुउद्देशीय शिक्षण प्रशिक्षण संस्था द्वारा संचालित सैनिक पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चे सचिव सत्यवान सिंग दुहान यांनी लॉर्ड बॅडेन पॉवेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
शाळेतील स्वच्छता मोहिमेद्वारे शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महिला,मुली,विद्यार्थ्यांना महिला सुरक्षेशी संबंधित विविध हेल्पलाइन क्रमांकांबाबत प्रबोधन करण्यात आले तसेच महिला सुरक्षा, स्वावलंबन आणि महिला सन्मान, सायबर सुरक्षे संदर्भात अभियान चालवले जात आहेत या बद्दल बखान केले.
त्यामुळे सर्व मुली,विद्यार्थी,महिलांना प्रतिकूल परिस्थितीत परावलंबी होऊन आपापल्या क्षेत्रात निर्भयपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारत विद्या मंदिर कुंभा, मारेगावचे सहायक शिक्षक व सहायक स्काऊट आयुक्त कृपाल कचकड सर यांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व पर्यवेक्षक जितेंद्र यादव यांनी सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष मेजर रणधीर सिंग दूहन, वस्तीगृह अधीक्षक वाल्मीक आडे, प्राध्यापक प्रफुल्ल, चौथे, सौ रंजना तिरणकर या वेळी उपस्थित उपस्थित होते. या शिबिरात प्रभारी स्काऊट गाईड राकेश दुहन यांनी विद्यार्थ्यांना चिंतन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
