मोटर रिवाईंडिंग दुकानातील १.५७ लाखांच्या कॉपर वायर चोरी उघड, दोन आरोपींना अटक

सहसंपादक: रामभाऊ भोयर

रावेरी येथील कपिल मोटर रिवाईंडिंग आणि विद्युत दुरुस्ती दुकानातील 1 लाख 57 हजार रुपयांच्या कॉपर वायर चोरीचा तपास करत राळेगाव पोलिसांनी व योग्य वेळी गावातील नागरिकांनी दाखविलेली सतर्कता मुळे धडक कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींची नावे उमेश शिवराम पवार (वय २९, रा. शांतीनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) आणि आसिफ मोईनुद्दीन शेख (वय ३४, रा. बोरगाव, ता. पुलगाव, जि. वर्धा) अशी आहेत.घटनेची माहिती
फिर्यादी कपिल मधुकरराव राऊत (व्यवसाय – मोटर रिवाईंडिंग व दुरुस्ती, रा. रावेरी, ता. राळेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता त्यांनी आपले दुकान व्यवस्थित बंद केले. मात्र, ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता दुकानाचे लॉक तोडले असल्याची माहिती मिळाली. दुकानात जाऊन पाहणी केली असता, दुकानातील २४ टेअर कॉपर वायर, वॉटरप्रूफ वायर बॉक्स यांसह एकूण १,५७,०००/- रुपयांचा माल चोरीला गेल्याचे उघड झाले.या घटनेची माहिती मिळताच
पोलिसांची कारवाई सूत्र सुळू केले आणि
फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली NPC सूरज चिवाणे आणि NPC सूरज गावंडे यांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपींचा पाठलाग करून उमेश पवार आणि आसिफ शेख यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार प्रिया बारेकर आणि नपोका रूपेश जाधव करत आहेत.
स्थानिकांचा प्रतिसाद
पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे स्थानिकांनी कौतुक केले आहे. ही पोलिसांची धडक कारवाई पुढील चोरीच्या घटनांना आळा घालेल, असे स्थानिकांनी मत व्यक्त केले. गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या शहरात चोरीचे प्रमाण कमी होणार का काही चोरीच्या वाहनाचा तपास अद्याप सुरू असून लवकरच चोरीतील इतर माहिती उघड होण्याची शक्यता आहे.