अंगणवाडी सेविका व मदतनीस वीस हजार पदे भरली जाणार


तालुका प्रतिनिधी:संदीप जाधव उमरखेड, लोकहित महाराष्ट्र


दिनांक .27 फेब्रुवारी फेब्रुवारी 2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मध्ये लवकरच भरण्यात येण्याची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू झालेले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय राज्य नवी मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार राज्यामध्ये, 97475 अंगणवाडी सेविका,13011 मिनी अंगणवाडी सेविका, 97475 मदतनीस असेल एकूण 2 लाख 7 हजार 9 61 पदे मंजूर असल्याचे पत्रकार जाहीर करण्यात आले. मंजूर पदांपैकी सुमारे 20 हजार 601 पदे रिक्त असल्याचेही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांनी पत्रात नमूद केले आहे. पदवीधर उमेदवार असल्यास त्यास पदवी परीक्षेमध्ये मिळविलेल्या गुणांचे टक्केवारीनुसार अतिरिक्त पाच गुण, चार गुण, तीन गुण, दोन गुण, एक गुण अशा प्रमाणे सुद्धा गुणमुल्यांकन होणार आहे गुण मूल्यांकन होणार आहे. अनुसूचित जाती, जमाती ,विधवा, अनाथ, उमेदवारांना दहा गुण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय उमेदवारांना पाच गुण देण्यात येणार आहे. ज्या गावात जास्त बोली भाषा असणारे विद्यार्थी असल्यास त्या बोली भाषेच्या सेविकाला अधिक प्राधान्य दिले जाईल.