भैंसा ते उमरखेड बस सेवा सुरू,माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाच्या प्रयत्नाला यश

ढाणकी/प्रतिनिधी : प्रवीण जोशी

तेलंगानातून विदर्भाला जोडण्यासाठी नुकतीच भैसा ते उमरखेड बस सेवा सुरू झाली.
आज सकाळी अकरा वाजता ढाणकी शहरात या बसचे आगमन होताच, माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे सर्व सदस्य तथा ढाणकीतील काही प्रतिष्ठित नागरिक या बसच्या स्वागताकरिता उपस्थित होते. यावेळी बस चालक रोहिदास जाधव, वाहक मुतीमन यांचा शाल व श्रीफळ देऊन शेख इरफान व अभिषेक पिंपरवार यांनी यथोचित सत्कार केला. ढाणकी वाहतुक नियंत्रक सुदीप देवरकर .
यावेळी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ ढाणकीचे अध्यक्ष शेख इरफान शेख गुलाब, सचिव हिरासिंग चव्हाण, उपाध्यक्ष बाबा खान, उपाध्यक्ष नाथा पाटील, चांदराव वानखेडे पळसपुर, सुनिल मांजरे,जुबेर पठाण, दीपक रावते, अतुल नरवाडे, अरुण येरावार, परमेश्वर डुकरे, हर्षद कवडे, धनंजय वाठोरे, सोनू सोनाळे यासह इतर नागरिक हजर होते.
ही बस सेवा सुरू करण्यासाठी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ ढाणकी यांच्या प्रयत्नाला यश आलेले दिसते.
कारण या बस सेवेमुळे ढाणकी व्यापार पेठेला हिमायतनगर रेल्वे व भैंसा तेलंगाना इकडे जाण्यासाठी फार सोयीस्कर झालेआहे. ढाणकी ते हिमायतनगर गांजेगाव मार्गे प्रवास करण्याकरिता प्रवाशांचे अक्षरशः हाल होत होते, सदर बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय टळत असून प्रवासी समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
तेलंगाणा भैंसा आगाराने प्राथमिकता देऊन ही जी बस सेवा सुरू केली. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विदर्भातील उमरखेड आगार निर्णय घेऊन आपली, लालपरी या मार्गावर कधी सोडणार ? याची सुद्धा प्रवाशांना आतुरता लागली आहे.

भैंसा आगारप्रमुख अमृता मोधळकर यांनी उमरखेड बस सेवा सुरू करून, या मार्गावरील प्रवाशांना सुखाची पर्वणीच दिली म्हणावी लागेल. ही बस भैंसा इथून दररोज सकाळी ८ वाजता निघून १२ वाजता उमरखेड पोहोचेल लगेच १२.३० वाजता उमरखेड हुन वापस भैसा जाईल. तर भैंसा ईथून दुसरी बस दुपारी १.३० वाजता निघेल व उमरखेड येथे अंदाजे साडेतीन, चार वाजेपर्यंत पोहोचून अर्ध्या तासाने वापस निघेल. ही बस भैंसा, वाशी, हिमायतनगर, पळसपुर, गांजेगाव, ढाणकी मार्गे उमरखेड येईल व याच मार्गाने वापस जाईल. सर्व प्रवाशांनी सदर बसचा लाभ घ्यावा व आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन करतो.

शे.ईरफान शे. गुलाब
अध्यक्ष, माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ ढाणकी.