
सहसंपादक -रामभाऊ भोयर
पो.स्टे. वडकी हद्दीत मागील महिन्यात करंजी सोनामाता येथे जबरी चोरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रोडवरील देवधरी घाटात लुटमार सारखे गुन्हे घडले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वडकी येथे गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपीत इसमांना तात्काळ अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपीनी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तात्काळ व कौशल्यपुर्वक तपास करून गुन्हा उघडकीस आणल्यामुळे मा.पोलीस अधीक्षक साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडून वडकी पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले व सपोनि महाले साहेब,पोलीस अंमलदार विनोद नागरगोजे, विलास जाधव,सचिन नेवारे, विकास द्यावर्तीवार या सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करून त्यांचेअभिनंदन करण्यात आले .तरी पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नये करिता पोलीस सतर्क आहे असे ठाणेदार कर्तव्यदक्ष विजय महाले यांनी सांगितले.
