
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब नगर पंचायतच्या वतीने माझी माती माझा देश व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश- निसर्गाचे हे पंचतत्व तसेच वसुंधरेप्रति आपली जबाबदारी म्हणून पृथ्वी तत्वाखाली वसुधा वंदन उपक्रम प्रभाग क्रमांक ७ येथील स्मशानभूमी कळंब परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आज दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आला. प्रत्येक नागरिकाने एक वृक्ष लावून जोपासला पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल, असे आवाहन न.पं. मुख्याधिकारी श्री. अनुप अग्रवाल यांनी केले. तर प्रदूषणाने हवा दूषित होऊन अनेक आजार वाढतात. त्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण कार्यात सहभागी होऊन वृक्षारोपण करून ते जगविले पाहिजे असे मनोगत स्वच्छता दुत प्रशांत डेहनकर यांनी व्यक्त केले. यावेळी वृक्षारोपण करिता लागणारे खत अंबा ॲग्रोचे संचालक श्री प्रशांत किनकर यांच्या कडून पुरविण्यात आले तसेच न.प. कळंब क्षेत्रात वृक्षारोपण करणाऱ्या संस्थांना खत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी न.प. उपाध्यक्ष श्री.आकाश कुटेमाटे, मा. नगरसेवक सर्व श्री. चंद्रशेखर चांदोरे, योगेश धांदे, मारोती वानखेडे, मा. नगरसेविका सौ.माला मारोती सुरदुसे, न.प. प्रशासकीय अधिकारी सुनील मगर, पाणीपुरवठा अभियंता हर्षल पवार, लेखापाल शुभम भोयर, नारायण रोहणे, पुनेश्वर चांदवे, सुनिल डखरे, गजानन येंडे, अविन वेल्के, अमित मोहनापुरे, आदित्य कळमकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन अक्कलवार, मारोती सुरदुसे तसेच सरफराज खान, शमशेर खान, रामकृष्ण फुल्से, कवडु मालखेडे, अरविंद मांडवधरे व न.पं सफाई कर्मचारी वृंद, हिरवाईचे गाव कळंब त्याचे नाव यांचे प्रतिनिधी तसेच गावकरी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कदंब, पिंपळ, वड, निंब, गुलमोहर इत्यादी स्वदेशी वृक्षांची लागवड करुन अमृत वाटिका निर्माण करण्यात आली.
