ढाणकी येथे अवैध दारू ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधि: बिटरगांव (बु ) शेख रमजान

बिटरगांव ( बु ) पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बनसोड यांनी ढाणकी येथील.आज १४ जुलै रोजी गोपणीय माहितीवरून स्वप्निल रमेश पराते वय २५ रा ढाणकी, हा अवैध दारू वाहतूक करताना मिळून आला. त्याच्याजवळ १९२ देशी दारूचे बॉटल,४ पेटी किंमत १३४४० रुपय व मोटर सायकल क्रमांक MH २९ DK १६३८, ही ५० हजार ची मोटरसायकल, असा एकुण ६३४४० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.

वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई बिटरगांव ( बु ) चे ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शनात पीएसआय शिवाजी टिर्पुणे, बिट जमादार मोहन चाटे ,पोलीस कॉन्स्टेबल निलेश भालेराव, प्रवीण जाधव, यांनी केली पुढील तपास बिटरगांव ( बु )पोलीस स्टेशन करीत आहे.