धक्कादायक:वरोरा शहरात शिव (शंकर भगवान)मूर्तीची विटंबना ,या घटनमागे कोण?

वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या मटण मार्केट जवळ असलेल्या भगवान शंकराच्या मूर्ती ला खंडित केल्याने वरोरा शहरात एकच खळबळ माजली आहे. या भागात गांजा ,दारू पिणारे व्यसनी लोकांचा जास्त वावर असल्याची माहिती आहे. वरोरा शहरात सर्व धर्माचे नागरिक मिळून एकोप्याने राहत असताना अशी घटना ही धार्मिक वाद निर्माण करणारी आहे.

काही वर्ष आधी गणपती विसर्जनात झालेली घटना अजूनही वरोरा वासीय विसरले नाही .तो दिवस आठवला तरी कित्येक नागरिकांच्या अंगावर काटे उभे राहतात .त्या घटनेत कित्येक वरोरा शहरातील व्यापारी बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.तीन दिवस कर्फ्यु लागला होता .महाशिवरात्री जवळ असताना भाजीपाला मार्केट जवळ असलेल्या शंकर जी च्या मूर्तीला दगडाच्या साहाय्याने खंडित केल्याने हिंदू धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही मूर्ती खंडित करण्याच्या मागे कोणाचा हात आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाही मात्र ही घटना वरोरा शहरातील शांतलेला भंग करणारी ठरू शकते अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे