
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
जगातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उचलने हेच वृतपत्राचे काम असून पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे असे उदगार साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपअंक – २०२२ या दिवाळी अंकाचे उद्घाटक म्हणून उदघाटन करित असतांना प्रगतशील साहित्य व विचारवंत मा. गीत घोष यांनी काढले
ते साप्ताहिक राळेगांव समाचार दिपअंक प्रकाशन सोहळ्याचे उदघाटक म्हणून बोलत होते.
साप्ताहिक राळेगांव समाचार कार्यालय, इंदिरा नगर तहसील समोर, राळेगांव येथे पारपडलेल्या या सोहळ्याचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.राज्य होते ,उदघाटक मा. गीत घोष हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आशिष कांबळे अमरावती हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र शेराम नगराध्यक्ष न.पंचायत, राळेगांव, श्रीमती उषाताई भोयर जि.प.सदस्या, यवतमाळ, चित्तरंजन कोल्हे ता.अध्यक्ष भा .ज.पा.तथा जि.प. सदस्य, प्रशांत तायडे सभापती पंचायत समिती, राळेगांव, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा कॉग्रेस कमिटी, यवतमाळ, जानराव गीरी उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगांव, अड.प्रफुल चौहान जिल्हा महामंत्री भाजपा, यवतमाळ, एड. फिडेल बायदाणी, जेष्ठ विधिज्ञ, राळेगांव, अरविंद फुटाणे ता.अध्यक्ष काँग्रेस कमिटी ,राळेगांव, शंकर वरघट जिल्हा उपाध्यक्ष मनसे, यवतमाळ, विनोद काकडे तालुका प्रमुख शिवसेना राळेगांव, राजेश काळे, तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना, राळेगांव, नंदकुमार गांधी सभापती, वसंत जिनिंग राळेगांव, मिलींद इंगोले अध्यक्ष खरेदी विक्री संघ, राळेगांव, सचिन हुरकुंडे, अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी, राळेगांव, कुदनभाऊ कांबळे, नगरसेवक, नगर पंचायत, राळेगांव, सौ. कमरूनिस्सा हमिदभाई पठाण, नगरसेविका नगरपंचायत, राळेगांव, सौ.पुष्पाताई विजय कन्नाके, नगरसेविका, नगर पंचायत, राळेगांव ह्या उपस्थित होत्या.
पुढे बोलताना घोष म्हणाले की, हा आहे रे आणि नाही रे या दोन विचारधारेतील संघर्ष असून तो संघर्ष कमी होण्याऐवजी अधिक तिव्र होतांना दिसते आहे. लोकांचे संविधानिक हक्क सोडवण्याऐवजी कुंठित केले जात आहे, लोकांचा आवाज दाबल्या जात आहे. लोकांच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या पत्रकार विचारवंतांना जेल मध्ये डांबले जात असूश देशातील सत्ता तानाशाहीचे रुप धारण करुन देशातील कष्टकरी, शेतकरी व नागरिकांना देशोधडीला लावत आहे आणि वृतपत्राने राजकीय स्वरुप धारण करुन लोकांच्या बाजूने बोलने, लिहणे बंद केले आहे. त्यामुळे आपल्या देशाची आज ही अवस्था आहे. या अवस्थेतून बाहेर पडाये असेल तर वृतपत्र आणि पत्रकारांनी निर्भिडपणे लोकांच्या बाजूने लिहायला लागले पाहिजे आणि लोकांनी देखील आम्ही भारताचे नागरिक म्हणून सत्तेला प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरले पाहिजे कारण ज्या देशातील जनता मुकी तो देशातील लोकांना भांडवलशाहीच्या पारतंत्र्यात जगावे लागते,असेही ते म्हणाले. प्रमुख वक्ते प्रा.आशिष कांबळे यांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ह्या व्यवस्थेचा खरपूस समाचार घेत पत्रकारांनी लोकांच्या हक्कासाठी लढले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.
या प्रसंगी वनीश घोसले, सरपंच ग्रामपंचायत पळसकुंड, विजय धानोरकर, उपसरपंच, गट ग्रामपंचायत वाटखेड यांचा सत्कार घेण्यात आला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक फिरोज लाखाणी संपादक साप्ताहिक राळेगांव समाचार यांनी केले तर
संचालन- मझीनी बायदाणी यांनी केले.
या सोहळ्याला गावातील जेष्ठ नागरिक अशोकभाऊ राऊत, कृष्णराव राहुळकर, अंकुश मुनेश्वर, निश्चल बोभाटे, प्रदीप ठुणे, युसुफ अली सैयद, गुरुदेव सेवा मंडळाचे गंगाधर घोटेकार व सर्व गुरुदेव सेवक, पत्रकार बांधवांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी साप्ताहिक राळेगांव समाचार परिवार, आदर्श मंडळाचे सर्व सदस्यांनी वितरक, वार्ताहर यांनी परिश्रम घेतले.
