
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांच्या रयतेचे राज्य विचारधारेची ओळख व्हावी व प्रबोधनाचा जागर घडावा त्यातून प्रेरणा घेऊन समतेवर आधारित राष्ट्र निर्माण व्हावे या उद्देशाला समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिं १९ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२३ ला शिवतीर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे समोर मेटीखेडा रोड राळेगाव येथे करण्यात आले.
यावेळी पुढील कार्यक्रम रविवार दिं १९ फेब्रुवारी २०२३ रोज सकाळी ९:३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपंचायतचे नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, ग्राम. वि.वि. सोसायटीचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे, नगरपंचायत चे बांधकाम सभापती संतोष कोकुलवार, वसंत जिनिंग चे अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक नंदकुमार गांधी,
रमेशराव कन्नाके सामाजीक कार्यकर्ते
माजी नगराध्यक्ष मालाताई खसाळे,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष महेश शेंडे, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद काकडे ,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शशिकांत धुमाळ, तालुका प्रमुख शिवसेना (शिंदे गट) मनोज भोयर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, भाजपा शहराध्यक्ष कुणाल भोयर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, शिवसेना शहराध्यक्ष राकेश राऊळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, रिपाई तालुका अध्यक्ष गोवर्धन वाघमारे, शहर संघटक शिवसेना (शिंदे गट )संदीप पेंदोर, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विनय मुनोत, वकील संघाचे अध्यक्ष प्रितेश वर्मा, नगरसेविका कमरुनिषा पठाण, नगरसेवक कुंदन कांबळे, नगरसेवक मंगेश राऊत, नगरसेवक दिलीप दूधगीकर, नगरसेवक मधुकर राजूरकर आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता शालेय वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेचे विषय (१)युद्धपलीकडचे छत्रपती (२) स्वराज्य निर्मिती जिजाऊ चे योगदान या विषयावर होणार आहे त्या वकृत्व स्पर्धेला अध्यक्ष म्हणून अशोक राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद तामगाडगे, विजय तायडे, डॉ ओम प्रकाश फुलमाळी हे असणारे या स्पर्धेच्या अटी पुढील प्रमाणे असून राळेगाव तालुका शालेय विद्यार्थी वर्ग ९ ते १२ वी चा असणे आवश्यक आहे तसेच सोबत शाळेचे ओळखपत्र आवश्यक स्पर्धेचे वेळ पाच मिनिट असणार आहे. तसेच १२:०० वाजता खुली वकृत्व स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे विषय (१) छत्रपती शिवाजी महाराजांची नीती आजची राजकीय वर्तमान परिस्थिती (२) एकमेवाद्वितीय लोककल्याणकारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर राहणार असून वेळ केवळ ७ मिनिटांचा असणार आहे. तर १० ते १:०० या वेळात किल्ले स्पर्धेचे आयोजन केले आहे यात (१) स्पर्धकांनी किल्ले धरून बनून आणणे (२) प्रदर्शनी स्थळ शिवतीर्थ राळेगाव तसेच याच वेळात चित्रकला स्पर्धा होणार असून चित्रकला स्पर्धेचा विषय (१) छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र विषयी (२) प्रदर्शनी स्थळ शिवतीर्थ राळेगाव हे असून या स्पर्धेच्या अटी पुढील असून स्पर्धकांनी (१) चित्र घरून काढून आणणे(२) चित्राचे साईझ ही एफोर ड्रॉईंग वहीचा पेपर असावा (३)काढलेले चित्र १७ फेब्रुवारी२०२३ पर्यंत स्वीकारल्या जाईल (४) चित्राच्या खालच्या बाजूला स्वतःचे नाव व मोबाईल क्रमांकावर लिहावा (५) स्पर्धेत वयोगटातील १३ वर्षापर्यंतचे विद्यार्थी भाग घेवू शकतील (६) काढलेले चित्र विनय मेडिकल येथे ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकावे
तसेच या स्पर्धेतून येणाऱ्या क्रमांकाला पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार असून ज्या स्पर्धकाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी मो.नं ९४२१७१३५०७ वर फोन संपर्क करून व २०० रुपये प्रवेश फी भरून स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
तसेच दिं २० फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५:०० वाजता वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत (वयोगट तीन ते दहा वर्ष )असणार आहे या स्पर्धेचे अध्यक्ष पुरुषोत्तम ओंकार माजी विस्तार अधिकारी तर प्रमुख अतिथी मधुकर गेडाम, कृष्णाजी राहुळकर, गंगाधर घोटेकर, ज्ञानेश्वर मुडे, वाल्मीक मेश्राम, हे असणार आहे. सायंकाळी ६:०० वाजता ह. भ. प .गौरीताई सांगळे कीर्तनकार व संच झी टीव्ही फेम मराठी आर्टिस्ट यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके तर प्रमुख अतिथी अँड प्रफुल मानकर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ अरविंद वाढोनाकर जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल यवतमाळ ,वर्षाताई राजेंद्र तेलंगे संचालक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक, मिलिंद इंगोले सभापती खरेदी विक्री संघ राळेगाव, राजेंद्र तेलंगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, मोहिनीताई बोबडे सभापती बालकल्याण नगरपंचायत राळेगाव,नगरसेविका अश्विनीताई लोहकरे, जोत्सनाताई राऊत, पुष्पाताई कन्नाके, सिमरन पठाण, नलूताई शिवणकर, कविताताई कुडमथे, जोत्सनाताई डंबारे आधी असणार आहे. तर २१ फेब्रुवारी २०२३ ला ५:३० वाजून मिनिटांनी सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ रवींद्र कानडजे तहसीलदार राळेगाव हे असणार तर प्रमुख व अतिथी संजय चौबे पोलीस ठाणेदार राळेगाव, अनुप अग्रवाल मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत राळेगाव हे असणार यांच्या उपस्थितीत होणार आहे . तर सायंकाळी ६:३० वाजता ह .भ.प. सुसेन महाराज नाईकवाडे व संच यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अशोक उईके माजी आदिवासी विकास मंत्री हे लाभणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून चित्तरंजन दादा कोल्हे तालुका अध्यक्ष भाजपा राळेगाव, सौ.प्रितीताई काकडे जिल्हा परिषद सदस्य, श्रीमती उषाताई भोयर जिल्हा परिषद सदस्य, प्रशांत भाऊ तायडे माजी सभापती पंचायत समिती राळेगाव, सदाशिव महाजन माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असून या सांस्कृतिक व प्रबोधन कार्यक्रमाला समस्त नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व राळेगाव वासीयांतर्फे करण्यात आले आहे.
