
प्रतिनिधी//शेख रमजान
जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी प्रशासनाने तत्परता व कार्यक्षमतेने काम करावे असे निर्देश देत उमरखेड, महागाव मतदारसंघात गरजेच्या ठिकाणी रोहित्र बसविण्याचे व मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश उर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. उमरखेड आणि महागाव (जिल्हा यवतमाळ) तालुक्यांतील ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा आढावा संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांच्यासह उर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व नितीन भूतडा भाजपा यवतमाळ -पुसद समन्व्यक उपस्थित होते.
