
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे दिनांक 24 जुलै रोजी इको क्लब ची स्थापना करण्यात आली. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने इको क्लब व मिशन लाइफ या अंतर्गत “एक पेड मा के नाम” व “हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र” या अभियाना अंतर्गत करण्यात येणाऱ्या दहा कोटी वृक्ष लागवडीत शाळेचा सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी इको क्लब ची स्थापना करण्यात आली.
पर्यावरणाची काळजी, जागरूकता, पर्यावरण पूरक उपक्रम, एक पेड मा के नाम अंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग व समुदायाचा सहभाग इत्यादी विषयावर सखोल माहिती देण्यात आली.
शाळेत इको क्लब ची स्थापना प्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक विजय कचरे यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मागील सत्रामध्ये शाळेत दीडशे वृक्षांची लागवड हरित सेना तथा इको क्लबच्या माध्यमातून करण्यात आली होती. याही वर्षी शाळेने आपला संकल्प सादर केलेला आहे यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले तथा शाळेच्या आवारात सुद्धा 100 झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
शाळेत विविध उपक्रम राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बी.के. धर्मे व सचिव डॉ. सौ अर्चनाताई धर्मे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आलेले आहे.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सुचित बेहेरे, शिक्षक राजेश काळे, विनोद चिरडे,शिक्षिका मनीषा इखे मॅडम व हरित सेना प्रभारी शिक्षक गोपाल बुरले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कु प्राची शेंडे व कु सृष्टी फाले तसेच विद्यार्थी प्रतिनिधी लक्ष देशमुख व दर्शन जाधव तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन हरित सेना प्रमुख गोपाल बुरले यांनी केले.
