वरुडवासी अनेक समस्यांनी हैराण, नवनिर्वाचित खासदारांनी तरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे : श्रावनसिंग वडते

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर हे गाव एक शेतकरी शेतमजूर यांच्या माध्यमातून चालत असलेले गाव. शेतकरी व शेतमजूर एकमेकांवर निर्भर आहे.अशातच या गावातील झालेल्या मध्यम प्रकल्पामुळे गावकरी मेटाकुटीला आला असून हा मध्यम प्रकल्प जरी वरुडला झाला असला तरी या तलावाचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होत आहे.कारण या तलावाचे पाणी सिंचनासाठी वरूडच्या फार कमी शेतकऱ्यांना मिळत असून ‌ हा तलाव ज्या नाल्यावर झाला आहे तो नाला बंजारा वस्ती आणि गावालगत वाहात असून तो नाला वाहणे बंद झाल्याने नाल्यात खूप झाडेझुडपे व गाळ साचला आहे . तलाव ओव्हरफ्लो झाल्यांने पाणी नदी भरुन वाहत आहे परत रात्री जोरात पाऊस आला तर वस्तीत पाणी घुसण्याच्या धाकाने लोकं झोपत नाही ‌सोबतच गावाजवळील नाल्या पलिकडे स्मशानभुमी व शेतकऱ्यांची शेतीची कामे व मजूराची मजूरी हे सर्व थांबले आहे.मागील दोन वर्षांपूर्वी एक जोडपे वेष्टवेअर मधून वाहून गेले तेंव्हा पासून कुठलाही शेतकरी शेतमजूर या रपट्यावरुन जाण्यासाठी हिम्मत करत नाही.जेंव्हा जोडपे वाहून गेले त्यावेळी अनेक पदाधिकारी, अधिकारी महोदयांनी पाहणी करून नाला रुंदीकरण व रपट्याच्या ठिकाणी उंच पुल बनविण्याचे आश्वासन दिले परंतु या वर्षी पर्यंत नाला रुंदीकरण करण्यात आले नसल्याने गावकरी मेटाकुटीला आले असून त्यांना आता नवनिर्वाचित खासदारांनी भेट देऊन ताबडतोब. वरुडवासियांना धीर द्यावा अशी मागणी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून लवकरच गावकऱ्यांना घेऊन तक्रार निवारण निवेदन तालुका स्तरीय अधिकाऱ्यांना देणार असून तक्रारीच्या प्रती वरीष्ठांना पाठविणार असल्याचे म्हटले आहे.