संस्कृती संवर्धन विद्यालयात हुतात्मा दिन कार्यक्रम

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव : दि. ३० जानेवारी २०२४ : संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव शाळेत युगपुरुष, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी झाली. यानिमित्ताने शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले व दोन मिनिटे मौन पाळून गांधीजींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यश दिलीपराव शिखरे, ध्रुव संदीप डोंगरे , जितेश विनोद डहाके या विद्यार्थ्यांनी , ” बुरा मत देखो, बुरा मत,सुनो, बुरा मत बोलो, ही गांधीप्रणित तीन तत्वे आपल्या अभिनयाद्वारे सादर करुन उपस्थितांना संदेश दिला. दिनविशेषा निमित्त व्यसनमुक्ती शिबिर व बालविवाह मुक्तीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्यसनमुक्तीवर नशाबंदी मंडळ यवतमाळ जिल्ह्याच्या संघटक तथा तज्ज्ञ ऍड.रोशनी कामडी यांनी व्यसन आणि त्यांचे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन बॅनर दाखवून मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे बालकल्याण समितीमध्ये क्षेत्र पर्यवेक्षक सौ. अर्चना क्षिरसागर यांनी अलिकडे लहान वयात मुला-मुलींचे लग्न लावून दिले जातात म्हणून *बाल विवाह मुक्तीसाठी विद्यार्थ्यांसोबत चर्चा पद्धतीने मुक्त संवाद साधून उचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी येसेकर होत्या. सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी आत्राम आणि आभार प्रदर्शन राकेश नक्षिणे या शिक्षकांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिनकर उघडे, देवेंद्र मून, योगेश मिटकर, सलमा कुरेशी, भाग्यश्री काळे , विलास ठाकरे, अनंता परचाके मुकुंद मानकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.