
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोलीस स्टेशन मुकूटबन येथील जमादार विनोद नागरगोजे यांना दिनांक १३ डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे ठाणेदार पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम नेरड येथे नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान टाटा मोटर्स कंपनीचा टिपर वाहन क्रमांक MH-03 CV-1790 हे वाहन तपासले असता, त्यामध्ये विना परवाना अवैधरित्या ३ ब्रास रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर वाहन जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पवन विलास कार्लेकर (वय ३३), रा. कोंढा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे तसेच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूटबन पोलीसांनी केली आहे.
