
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पॅकेज मध्ये घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांना पिक विम्याचा अग्रीम द्यावा तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा द्यावा या मागण्यांसाठी राळेगाव ग्राविकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये खरीप 2025 26 मध्ये अतिवृष्टीमुळे राळेगाव शहरासह तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेती, शेतमाल, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी 31 हजार 600 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते त्यामध्ये पंतप्रधान पिकविम्यासाठी हेक्टरी 17000 रुपयांचा अग्रीम बोनस देण्याची घोषणा केली होती मात्र आज चार महिने उलटूनही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही तसेच तालुक्यासह जिल्ह्याची आणेवारी सुद्धा 50% च्या आत आहेत त्यामुळे शासनाने जाहीर केल्यानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांचा पिक विम्याचा अग्रीम बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा याशिवाय शहरात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने व कुठल्याच पिकाचे समाधानकारक उत्पादन न झाल्याने व भरीसभर शहराची आणेवारी सुद्धा 50% च्या आत असल्याने शासनाने विमा कंपन्यांना सक्तीचे निर्देश देऊन शहरातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा राळेगाव ग्राविकाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देताना अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी विनायक नगराळे कृष्णराव राऊळकर तातेश्वर पिसे प्रभाकर राऊत अशोक पिंपरे विनोद नरड गजानन पाल नितीन महाजन विभा गांधी ज्योती डाखोरे प्रकाश मेहता प्रदीप ठुने उपस्थित होते
