
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शासकीय विश्राम गृह, यवतमाळ येथे आज सभेचं आयोजन केले होते सभेचे काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली होती मुख्य विषयांच्या अनुषंगाने प्रास्ताविक मा गोविंद चव्हाण यांनी केले देशात सुरू असलेली राजकीय सुलतानी राजवट लोकशाहीचा भंग करणारी दिसून येतं आहेत म्हणून भारतीय लोकशाही संवैधानिक मानवतावादी संघटना निर्माण करण्यासाठी “‘ स्वातंत्र्याच्या शत्रुसंगे “‘ ही मानवतावादी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य निमंत्रक म्हणून मा.एम के कोडापे यांची निवड करण्यात आली आहे.
मानवतावादी समन्वय समिती मध्ये ११ समिती सदस्य म्हणून काम करणार आहे. राजकीय हुकमशाही लोकशाही ला घातक आहे म्हणून देश हितासाठी विविध योजना राबविण्यासाठी “‘ कर्तव्यदक्ष सरकार “‘ असले पाहिजे यासाठी ही समिती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कार्य करणार आहे या सभेसाठी प्रामुख्याने उपस्थित मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, प्रमोद कांबळे, चिंतामण ठाकरे,डी के भगत बाळुभाऊ निवल कृष्णा भोंगाडे कावलकर साहेब पुणाजी मेश्राम महादेव सिडाम आणि बहुसंख्येने सदस्य उपस्थित होते
