पं. दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ,हिंदवी स्वराज गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी :प्रवीण जोशी
यवतमाळ

भारतीय जनसंघाचे संस्थापक, एकात्ममानववाद व अंत्योदयचे प्रणेते, पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित, सेवा सप्ताहाच्या औचित्याने, ढाणकीतील प्रतिष्ठित, ढाणकीचा राजा म्हणून ओळख असलेले, हिंदवी स्वराज गणेश मंडळाच्या वतीने, तसेच भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर च्या वतीने, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यासह “मेरी माटी, मेरा देश” या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून, मेरी माटी, मेरा देश उपक्रम राबवून, भव्य रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज गणेश मंडळाने पुढाकार घेतला.
याप्रसंगी ढाणकी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, भाजप शहराध्यक्ष रोहित वर्मा, तालुका उपाध्यक्ष महेश पिंपरवार, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जयस्वाल, पुंजाराम हराळे, प्रभाग पाच चे नगरसेवक उमेश योगेवार, साई मंतेवाड, पंकज केशेवाड, सतीश गडदे, सुदर्शन देवरकर, विनायक आक्कावार, उमेश विभुते, सुमित मुखिरवाड,उमेश कुंभारे, सचिन मंतेवाड, यांसह ढाणकी भाजपचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हिंदवी स्वराज गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुगोविंद सिंगजी ब्लड बँक नांदेड येथील, संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.