
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज कुठलीही मोहीम आखताना किंवा कुठलेही काम हाती घेताना त्याचे नियोजन योग्य रीतीने करायचे. महाराजांच्या यशामध्ये निश्चितच नियोजनाचा भाग महत्त्वाचा होता, असे मत विनोद तायडे यांनी मांडले.प्रमुख वक्ते म्हणून विनोद तायडे बोलत होते. महाराजांचा
नियोजनावर अधिक भर असायचा. काम किती करता कस करता याला महत्व नसून कामाचं नियोजन जर योग्य असेल तर ते काम किंवा मोहीम अंतिम ध्येयापर्यंत निश्चित पोहोचते, असा महाराजांचा ठाम विश्वास होता, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक विजय कचरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सुचित बेहेरे, अरुण कामनापुरे, प्रा. प्रवीण चौधरी उपस्थित होते. यावेळी पूर्वा घोटेकर, कृतिका मंगळे, अनुश्री तामगाडगे,
पियुष मेश्राम, प्रतीक दारव्हेकर, निधी आजनकर या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवर भाषणे दिली. प्रमुख वक्ते विनोद तायडे यांनी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत विद्यार्थ्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनातील प्रत्येक प्रसंगाला तोंड देत यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी अवसरमल हिने तर आभार कीर्ती निखाळे हिने मानले. कार्यक्रमाला शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
