एकलारा येथे वंदनीय सत्यपाल महाराज यांचे जाहीर कीर्तन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव वरून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गट ग्रामपंचायत लोहारा- एकलारा व नवनिर्माण महिला ग्राम संघ/ मत्स्य बीजोत्पादन केंद्र एकलारा यांच्या वतीने व स्व. डॉ बाबाराव भोयर (मानवसेवी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक वंदनिय सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिं ४ एप्रिल २०२२ ला सायंकाळी ठीक ८:०० वाजता छाया चौधरी यांच्या शेतात होणार आहे. तसेच दिं ४ एप्रिल २०२२ रोज सोमवारला सकाळी ५:३० मिनिटांनी दैनंदिन सामुदायिक ध्यान ग्रामस्वच्छता व सामुदायिक प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळ एकलारा यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ठीक ७ :०० वाजता गुरुदेव प्रार्थना सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज असतील तर उद्घाटक म्हणून प्राचार्य आमदार अशोक उईके हे असणार आहे तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत चित्तरंजन कोल्हे, उषाताई भोयर प्रशांत तायडे, डॉ कुणाल भोयर, प्रफुल्ल मानकर, विवेक दौलतकर, शीलाताई सलामे, सौ.ललिताताई कृष्णाजी आत्राम (सरपंच) सौ.ललिताताई राजू ससाने (उपसरपंच) सौ.सीमाताई अनिल मंगाम सदस्य, चंद्रशेखर चौधरी सदस्य, विजय मडावी सदस्य, सौ. उर्मिला संजय येडसकर सदस्य, सौ.मीनाताई गजानन नाटक सदस्य, प्रल्हाद आत्राम (पोलीस पाटील) दीपक धनरे, (ग्रामसेवक) किशोर चौधरी, नाना सिडाम, पुंडलिक गेडाम, पुंडलिक राऊत,आदी असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.आनंद चौधरी करणार असून राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक वंदनिय सत्यपाल महाराज चिंचोळकर यांच्या कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक आवर्जून उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घ्यावा असे आव्हान गुरुदेव सेवा भजन मंडळ, जय बजरंग क्रीडा मंडळ, आदिवासी भजन मंडळ, मंजुळामाता महिला भजन मंडळ, लक्ष्मीमाता महिला भजन मंडळ एकलारा, तसेच समस्त ग्रामवासी एकलारा, नवनिर्माण महिला ग्रामसंघ व मत्स्यबीजोत्पादन केंद्र एकलारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.