डॉक्टरला देवाचे दुसर रूप म्हणून भाविक भगत देव दत्त मांजरी परिसरामध्ये चांगलीच चर्चा

उमरखेड तालुका प्रतिनिधी :- विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )

पंडित जाधव रा. दत्त मांजरी ता.माहूर येथून त्यांच्या पत्नी ला GMC यवतमाळ येथे दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे.परंतु डॉक्टर आज सिजर करू , उद्या करू असं करून टाळत होते . आशा ची तब्येत नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होऊन सुद्धा हे तीन दिवस जास्त झाले होते तिला खूप त्रास होत होता अशा परिस्थितीत आमचे नातेवाईक निंगनुर येतील निकेश राठोड हेल्प फौंडेशनचे यांच्या माध्यमातून भाविक भगत यांच्याशी संपर्क साधला ते मीटिंगमध्ये होते. थोड्या वेळासाठी भेटायला या असं सांगितलं भाऊ लगेच आले व डॉ. सोबत त्यांनी संवाद साधला व त्यांच्या पत्नीच्या सीजर साठी डॉक्टरने लगेच तयारी केली साधारणतः 3 तासामध्ये माझे पत्नी आणि बाळ दोनही सुखरूप आहे . त्यामुळे त्यांनी हेल्प फाउंडेशन चे निकेश राठोड यांच्या माध्यमातून भाऊंनी जी मदत केली. ती अतिशय त्या वेळेची खूप महत्त्वाचे होती. कारण की जर बाळांनी पोटामध्ये सी किंवा सु केली असती तर त्याचं विष तयार होतं त्यामुळे दोघांपैकी एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो असं डॉक्टर ने सुद्धा सांगितलं . त्यामुळे ही मदत आम्हाला लाख मोलाची होती . पत्नीचा आणि बाळाचा जीव श्री भाविक भगत मुळे मिळाला त्यामुळे भाविक भगत यांचे आभार मानले.