
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव द्वारा आयोजित RPL चषक – 2023 क्रिकेट स्पर्धेचे आज होणारा उदघाटन सोहळा पावसाअभावी रद्द करण्यात आला होता, तो उद्या दिनांक 28 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी आदर्श दुर्गा माता मंदिर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे परिसर इंदिरा नगर राळेगाव येथून “क्रीडाज्योत संदेश रॅली” राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री मा. प्रा. वसंत पुरके सर यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या रॅली चा समारोप क्रिकेट स्पर्धेच्या ग्राउंड वर होऊन क्रिकेट स्पर्धेचे उद,घाटन प्रा. वसंत पुरके सह अन्य मान्यवरांचे उपस्थितीत होतं आहे, तरी सर्व मान्यवर पाहुण्यांनी व क्रीडा रसिकांनी ग्रामीण भागातील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.फिरोज लाखाणी.आदर्श युवक विकास मंडळ,राळेगाव यांनी कळविले आहे
