मृगाची नुसती कोरडी सलामी मिरगी पेरणी तरी होईल का
नक्षत्र अन त्याच्या वाहनावर शेतकऱ्यांची आजही भिस्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सूर्य आग ओकतोय अंगाची होते काळी भुई पण तापलीय अधून मधून ढगांचे बी ही गिरट्या घालताय एकूणच सारं वातावरण पावसाचं आगुट मोहरल असेच पण यंदाच्या मृगाने सलामी दिली ती कोरडीच नक्षत्राचा पाचवा दिवसही कोरडा गेल्याने पुढे तरी वरूणराज्याचीब सात लाभेल अशी आस लावत बळीराजा आलेला तापात दिवस काढत आहे.
हत्ती वाहन असलेल्या मृग नक्षत्र हे आठ जून पासून सुरू झाले असले तरी अद्यापही मान्सून बरसला नसल्याने तालुक्यातील जीव मुठीत घालून तालुक्यातील बळीराज्यानी धुरळ पेरणीला सुरुवात केली आहे.
हवामान खात्याकडून सांगितले जात आहे की महाराष्ट्रात मान्सून दाखल झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी धुरळ पेरणीला सुरुवात केली आहे मृग नक्षत्रात हत्तीचे वाहन असल्याने या मृग नक्षत्रात हत्ती सारखा दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा बाळगून धुरळ पेरणीच्या कामाला लागला आहे परंतु मृग नक्षत्रात सुरुवातीपासून सायंकाळच्या सुमारास वादळ वाळा सुटतोय आकाशात काळे ढग दाटून येतात सर्वत्र अंधार पसरतो पाऊस मात्र पाऊस येत नसल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे मोसमी पावसावर निर्भर असलेल्या या भागातील शेती उन्हाळ्यातील मशागतीची पेरणी पूर्व कामे आटोकताच २५ मे च्या दरम्यान निघणाऱ्या रोहिणी नक्षत्रात मान्सूनपूर्व ढगांनी झलक दाखविलेले असते इथूनच शेतकरी पावसाचे आज अन हंगामातील रास मनी धरतो पुढे कोणतं नक्षत्र कधी सुरू होतं कधी संपते त्याचे वाहन काय आहे याचा ताळमेळ मनात घोळत असतो . कारणही तसेच आहे शेतकऱ्यांचा जेवढा हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास नाही तेवढा विश्वास पंचांग नक्षत्र त्यांची वाहने अन पूर्वज बुर्जूगांच्या दाखल्यांवर असतो या भागात मृगातील पाऊस व त्यावर केलेली मिरगी पेर भरभरून धान्य देणारी म्हणून समजली जाते मात्र आठ जून नक्षत्राला सुरुवात झाली असून चार ते पाच दिवस लोटले तरी अद्यापही मृग नक्षत्र बरसले नसल्याने मृगाची कोरडी सलामी शेतकऱ्यांना हिरमोड करणारी ठरनार तर नाही ना असे वाटू लागले आहे.