नवोदय क्रीडा मंडळाच्या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातुर जिल्ह्यातील चाकुर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील संघ उपस्थीत होते वअमरावती विभागाचे नेतृत्व राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळाचे खेळाडू यांनी केले व या स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूलचे १४ वर्षाआतील मुलाच्या संघाला सिल्वर मेडल (व्दितीय क्रमांक) प्राप्त केला आहे त्यांचा अंतिम सामना औरंगाबाद विभाग यांच्या सोबत झाला होता व नवोदय क्रीडा मंडळाचे स्कूल ऑफ ब्रिलियंटच्या मुलाच्या १७ वर्षाआतील संघाला ब्रास पदक (तृतीय क्रमांक) प्राप्त झाला आहे व न्यू इंग्लिश हायस्कूलचा १४ वर्षाआतील मुलीच्या संघाला सुध्दा ब्रास पदक तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सिल्वर पदक प्राप्त संघा मध्ये नवोदय क्रीडा मंडळाचे न्यू इंग्लिश हायस्कूलचे राळेगावचे खेळाडू १४ वर्षाआतील मुले निसर्ग ताकसांडे वेदांत बोदडे मंथन ठाकरे नैतिक चौधरी सविधान हिवरकर सुजल कांबळे यांनी सहभाग घेतला होता आणि ब्रास पदक प्राप्त न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुलीच्या संघात राधिका फरकाडे, उन्नती झाडे, आयुशी पाटिल, सुहानी लांभाडे, प्रेमात शेलोटे तनिष्का बोबडे व तेजस्वी झामरे तर स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगावच्या १७वर्षाआतील मुला मध्ये अथर्व मालधुरे,क्रिष्णा खेडेकर,रोहित वनकर,योगेश वैद्य,ओम शेगेकर,प्रथमेश केवटे हे आहे हे सर्व खेळाडू राळेगाव येथील तालुका क्रीडा संकुल मधील नवोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर सराव करतात. खेळाडूंनी त्यांच्या यशाचे श्रेय तालुका क्रीडा अधिकारी सचिन मिलमिले, यवतमाळ जिल्हा टेनिस हॉलीबॉल संघटनेचे सचिव अभय धोबे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे शिक्षक किशोर उईके, आनंद घुगे तालुका क्रीडा संयोजक प्रफुल खडसे नवोदय क्रीडा मंडळाचे वरिष्ठ खेळाडू नरेश दुर्गे, गणेश काळे, अतुल मेश्राम, सोनु खान. सचिन डोंगरे, मिथून झाडे,अंकित क्षिरसागर, मोनु खान, सूरज भगत, महेश राजकोल्हे, सुरज उजवणे व पालकांना सर्व खेळाडूंनी श्रेय दीले आहे.