शेतात पाणी साचले बियाणे व लहान रोपटे बुडाले शेतकरी संकटात,मेंगापूर,बोरी व वाऱ्हा, सगमा परिसरात पावसाचा कहर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

काल रात्री तीन वाजता शेतकरी साखर झोपेत असताना निसर्गाने कहर केला राळेगाव मंडळात अतिवृष्टी झाली राळेगाव शहर ला लागून असलेल्या राळेगाव मंडळात तसेच वारा सगमा मेंगापूर बोरी परिसरात अतिवृष्टी झाली पावसाने कहर केला हजारो हेक्टर शेतातील लहान पिकाचे रोपटे तसेच बियाणे पाण्याखाली आले आहे आठ दिवसापूर्वीच या परिसरात जोरदार पाऊस झाला होता त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी पहाटे झाली शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जेमतेम कपाशी तुरी सोयाबीन ची पेरणी केली होती अजून पीकही उगवले नव्हते तर काहींच्या शेतात रोपटे जेमतेम बाहेर आले होते शेतकरी साखर झोपेत असताना जवळपास तीन तास ढगफुटी सदृश्य पाऊस पडला त्यामुळे शेती आहे की तलाव आहे हे सांगणे कठीण झाले आहे अक्षरशा शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे परिसरातील शेतकरी पप्पू होले प्रतिक बोबडे राजू नागतोडे प्रभाकर जुनघरे मंगला गिरी अजाब कारेकर राजू उरकुडे संजय इंगळे नामदेव ठोंबरे अण्णाजी फाळके गंगाधर चांदोरे राजेश निवल .गजानन उरकुडे राजू गांधी गणेश राऊत गजानन पाल नरेश दुर्गे सुलभा होले राहुल होले कृष्णा पाल इत्यादींच्या शेताला तलावाचे स्वरूप आले आहे याच परिसरात कॅनडी नाला असून या नाल्याला अक्षरशः पूर गेल्याने शेतीची ही अवस्था झाली या नाल्याची दुरुस्ती मागल्या वर्षीच करण्यात आली होती पाऊस इतका जोरदार होता की नाला फोडून शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले दरम्यान. केवळ दोन तासात 50 मिली पाऊस पडल्याचा अंदाज तहसीलदार अमित भोईटे यांनी व्यक्त केला…….. तालुका कृषी अधिकारी यांची भेट…. सकाळीच तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी परिसराला भेट देऊन शेताची पाहणी केली व पंचनामा शासनाकडे पाठवला जाईल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले