
प्रतिनिधी//शेख रमजान
नगरपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यासाठी परवानगी आवश्यक असते, यात वीज खांब लावणेही समाविष्ट असताना,नगरपंचायतीच्या परवानगीशिवाय रस्त्यावर वीज खांब लावता येत नाही. यासाठी संबंधित नगरपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक असताना आवादा सोलर कंपनीने परवानगी न घेता सोईट फाट्यावरून कबरस्थान रोडवर खंबे लावत आहे. या मुळे पुढे त्या प्रभागात रोडचे रुंदीकरण करायचे असल्यास अडचण होणार असून हा रस्ता करणे कठीण होणार आहे. तरीपण आवादा सोलर कंपनी आणि माहवितरण कंपनी सार्वजनिक रस्त्यावर वीज खांब लावत आहे. हे रस्ता नगरपंचायतीच्या अखत्यारीत येत असून या कामासाठी त्यांनी कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नाही.
या रस्त्यावरील वीज खांबामुळे मोठे वहान नेत असताना मोठी कसरत होणार असून काही अपघात झाल्यास जवळील असलेल्या पेट्रोल पंप मुळे मोठा अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही.यामुळे रस्त्यावरील वीज खांब लावण्याचे काम थांबून हे सोलर लाईन गावाच्या बाहेरून नेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.आता नगर पंचायत माहवितरण कंपनी ढाणकी यावर विना परवानगी सार्वजनिक रस्त्यावर पोल टाकल्यावर काय कारवाई करतील की थंड बस्त्यात ठेवतील यावर नजर लागली आहे.
चौकट
सोईट फाटा पासून कब्रसतानयेथील सार्वजनिक रोडवर माहवितरण कंपनी द्वारे सोलर कंपनी 11kv लाईन चे पोल विना परवानगी लावले असून त्यावर msb यांना पत्र देऊन आपण परवानगी घेतली नसून ते काम बंद करण्यास सांगितले असून कलम 179 नुसार कारवाई करण्यात येईल असे माहवितरण ढाणकी सहायक आत्राम यांना सांगितले आहे.
नगर पंचायत ढाणकी
पाणी पुरवठा अभियंता अन्वय पाटील
