
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक १६ जुलै रोजी शेतकरी शेतमजूर , महिला व बेरोजगार युवकांच्या हक्क अधिकारासाठी बिरसा ब्रिगेड च्या वतीने कळम तहसीलवर डॉ. अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ.कुळमेथे यांनी समस्यांचा पाळा वाचला व आपल्या भाषणात शासनाने तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा दिला.या आंदोलनात प्रामुख्याने शेतकऱ्याच्या,शेतमजूर,बेरोजगारयुवक,महिला यांचे प्रश्ना संधर्भात जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री यांना कळंब तहसील चे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यावेळी मागील वर्षापासून शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तरी तो तात्काळ देण्यात याव,शेतकऱ्यांची कर्ज माफी पूर्णतः करावी.शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज,क्रॉप लोन तात्काळ देण्यात यावे,पाऊसा मुळे शेतकऱ्यांच्या बियाणाचे झालेले नुकसान झाल्यामुळे त्यांच्या शेताचे सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसन भरपाई देण्यात यावी,
बेंबळा प्रकल्प कालव्याची पुनर्रचना करून व बेंबळा प्रकल्प पुर्ण करून त्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना वर्ष भर उपलब्ध करून देण्यात यावे,MIDC कळंब,राळेगाव,बाभुळगाव येथे सुरू करावी,राळेगाव,बाभुळगाव,कळंब येथे विद्यार्थांसाठी ग्रंथालय,वाचनालय,क्रीडांगण, व्यायाम शाळा निमार्ण करून द्याव्या,कळंब,राळेगाव, बाभुळगाव व यवतमाळ जिल्यातील आदिवासी गावांना पेसा मध्ये समाविष्ट करावेत,
अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तत्काळ देऊन त्यांना त्यांचा ७/१२ नावी करून द्यावा,कळंब ते वडकी या रोडवर दोन टोल नाके आहेत. हा कळंब ते वडकी रोड ग्रामीण भागातला रोड असून सुद्धा त्यावर टोल वसुली सुरू आहे. ते दोन्ही टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे,
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची मध्ये शिथिलता आणावी व सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करण्यात यावी, कळंब शहरातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचा फार तुटवडा आहे. तरी तात्काळ पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था कळंब शहरातील रहिवाशांना करून देण्यात यावी इत्यादी मंगण्यांसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी बिरसा ब्रिगेड चे प्रदेशकार्यध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे,राज्य संघटक प्रा.वसंत कनाके ,तालुका संपर्क प्रमुख उमेश येरमे,तालुका अध्यक्ष प्रमोद ईरपाते, सुगद नारायणे,सुरज मरस्कोल्हे,विनोद उईले,महादेव मेश्राम, अजाबराव कोरांगे,दिनेश मडावी,रोशन घोडाम,समीर वळे,नाना कनाके,गोलू कनाके,प्रशांत घोडम,विद्या परचाके,मधुरीताई उईके,संजय घोडाम, निकेश कनाके,महेश सोयाम,गणेश घोडाम,,भास्कर वजले, गोपाल,ठाकरे,मंदा बागवाले,गौतम उईके, श्रीराम पंधरे,बादल जुमनाके,संदीप मडावी, जयवंत मडावी, आलेकेश कनके, पुंडलिक कांबळे, कुशल वानखेडे,गणपत मस्कार,धनराज जुमनाके, महादेव शिवरकर, भास्कर वजले, हरिभाऊ आडे, उमेश मुकाल, गोपाल ठाकरे, रमेश सिडाम, अड .श्याम खंडारे,उमेश थाकुळकर,गौतम खैरकर,आदी उपस्थित होते.
