वरूड(जहागीर) येथे रासेयो चे श्रम संस्कार शिबिर संपन्न

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव च्या वतीने वरुड (जहागीर) येथे आयोजित श्रम संस्कार शिबीर विकसित भारत आणी सशक्त भारत शिबीर राबवण्यात आले होते.
या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल दौलतकार,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.शालिनी हटवार ,कार्यक्रम अधिकारी रुपेश पवार कला वाणिज्य माजी विद्यार्थी संघटना राळेगाव सदस्य विनोद देवतळे ,सुशील दादंडे प्रा.पंकज आत्राम समन्वयक बाल संस्कार केंद्र कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या शिबिरात गेल्या सात दिवसापासून गावात संपूर्ण गावाची स्वछता करण्यात आली गावातील नाल्या साफ करण्यात येवुन पथ नाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृृतीचा संदेश पोहचेल अशा प्रकारे पथनाट्य सादर करण्यात आले, या शिबिराच्या निरोप समारंभ प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वरुड (ज.) च्या वतीने सर्व शिबिरार्थींचा शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनसे वाहतुक तालुका अध्यक्ष स्वप्निल नेहारे, किरण कोल्हे, सचिन आत्राम, खुशाल राऊत, सुरज खैरी, योगेश राऊत, जयसिंग पवार, सागर ठाकरे, रतन चव्हाण, अमोल गेडाम, उमेश सिडाम, सुरज कोल्हे ,ओम नेहारे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.