
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नुकतीच सरकारने कर्जमाफी जाहीर केली त्यामध्ये दोन लाख रुपये पर्यंत कर्ज थकीत असलेल्या कर्जदार सभासदांना दिलासा दिला पण हे करीत असतानाच ज्या शेतकऱ्याकडे दोन लाख रुपयाचे वर थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांबाबत कुठलाही खुलासा न केल्याने ज्या शेतकऱ्याकडे दोन लाख रुपयांच्या वर थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचे भविष्य अजूनही अधांतरी आहे नुकतेच सरकारने कर्जमाफीची घोषणा केली त्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे दोन लाख रुपयांच्या वरती थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांबाबत कुठलेही दिशा निर्देश दिलेले नाहीत त्यामुळे असे शेतकरी अजूनही शासनाच्या दिशानिर्देशाकडे डोळे लावून आहेत ज्या शेतकऱ्याकडे दोन लाख रुपयांच्या वरती कर्ज थकीत आहेत अशा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये माफ होणार व वरचे कर्ज त्यांना भरावे लागणार किंवा दोन लाख रुपयांच्यावरती कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कुठलीच कर्जमाफी होणार नाही याबाबत कर्जमाफी मध्ये कुठलेहि स्पष्ट निर्देश नसल्याने अशा शेतकऱ्यांचे घोडे सध्या अडलेले आहेत सोबतच कर्जमाफीची घोषणा करत असताना मुख्यमंत्र्यांनी 30 जून पर्यंत कर्जमाफीचे सर्व निकष सांगितल्या जाईल असे म्हटले 30 जून ही तारीख सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोयीची नाहीत सर्वसामान्य शेतकरी 31 मार्चपूर्वी आपले कर्ज भरतात व त्यानंतर ते नवीन कर्ज घेत असतात आता 30 जून ही तारीख सांगितल्याने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे अशा शेतकऱ्यांना नवीन कर्ज कधी मिळेल कारण शेतीचा खरिपाचा हंगाम जरी जून महिन्यामध्ये सुरू होत असला तरी त्यासाठीची खर्चाची तजवीज शेतकरी एप्रिल मे महिन्यामध्येच करत असतात त्यामुळे कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ हा जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मिळेल म्हणजे तेव्हा खरिपाचा हंगाम अर्धा झालेला असेल सोबतच नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहेत ते 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना मिळाले असते तर शेतकऱ्यांना केवळ उर्वरित रक्कम भरावी लागली असती 31 मार्चपूर्वी ते भेटण्याचे सध्या तरी कुठलीही शक्यता नसल्याने नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा कर्जाची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहेत सोबतच त्यांना केवळ 50000 रुपयाचे प्रोत्साहन पर अनुदान दिल्याने नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहेत प्रत्येक कर्जमाफी मध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहेत प्रतिक्रिया अरविंद वाढोनकरll मुळात थकीत शेतकरी तसेच नियमित कर्जदार शेतकरी असा कुठलाही भेदभाव सरकारने करावयास नको होता सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे यावेळेस आवश्यक होते याशिवाय ही सर्व प्रक्रिया 31 मार्चपूर्वी जर केली असती तर निश्चितच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा पुरेपूर फायदा झाला असता।
विनोद पावडे शेतकरी :: प्रत्येक कर्जमाफीमध्ये नियमित शेतकऱ्यांवर अन्याय होतो तसा या वेळी सुद्धा झाला यावेळेस तर त्यांच्या सातबारा कोरा होणे आवश्यक होते तसे झाले नाही शिवाय कर्जमाफीची 30 जून ही तारीख सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजण्या पलीकडची आहे तसेच दोन लाख रुपये असणाऱ्या शेतकऱ्याबाबत सुद्धा कर्जमाफीत संदिग्धता आहे
