
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघ व मददगार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने यवतमाळ तालुक्यातील मडकोना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष सौ निताताई हारगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी मडकोणा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मडकोना केंद्र भारी पंचायत समिती यवतमाळ अर्तगत वर्ग ५ मध्ये शिकत असलेला प्रज्वल दिनेश गोठे हा विद्यार्थी जिल्हास्तरावर महादिप परीक्षेत उत्तीर्ण होऊन विमानवारी साठी पात्र ठरल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांच्या हस्ते प्रज्वल गोठे यांचा पुष्पगुच्छ, ट्रॉफी व अग्निपंख पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती ज्योती पिंजरकर , ( विद्यार्थ्याचे पालक ) श्री दिनेशभाऊ गोठे (स्थापित्य अभियांत्रीक सहाय्यक जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग कळंब ) वर्ग शिक्षिका मरसकोल्हे मॅडम , श्रीमती शिरभाते मॅडम , श्री तामगाडगे सर, श्रीमती मंगाम मॅडम , श्रीमती नैना भोयर इ. मान्यवर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
भविष्यात कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षणा पासून वंचित राहू नये या उद्देशाने मददगार फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीब, होतकरू ,हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी दिली .
