औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ना धड पिण्याचे पाणी ना धड स्वच्छतागृह
प्रशिक्षण घेणाऱ्या संस्थेकडे संबंधितांचे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तालुक्यातील तसेच बाहेरील शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक समस्या भेडसावत आहे मात्र येथे ना धड पिण्याचे पाणी ना धड स्वच्छतागृह त्यामुळे येथील प्रशिक्षन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरूनच पिण्याचे पाणी न्यावे लागते तर येथील असलेल्या स्वच्छतागृहाची दैना झाली असल्याने येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीची कूचंबना होत आहे. तेव्हा संबंधितांनी याकडे लक्ष देऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या समस्या तरी सोडावे अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतात परंतु या संस्थेत काहीच कर्मचारी कायम स्वरूपी असून बाकी इतर कर्मचारी हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. मात्र संस्थेत कायम स्वरूप पूर्णवेळ प्राचार्य नसल्याने ही संस्था वाऱ्यावर सोडली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी व शिक्षकावर कोणाचाही अंकुश राहिला नसून येथील कर्मचारी हे मनमर्जी प्रमाणे वागत असल्याची चर्चा विद्यार्थी करताना दिसून येत आहे.
संस्थेत कुणाचाच अंकुश राहिला नसल्याने येथील अनेक तक्रारी वाढल्या आहेत.त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे सभोवताल झाडाझुडपे वाढली असून येथे मोठ्या प्रमाणात हिरवेगार तन वाढलेले आहे त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यामुळे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. तेव्हा वेळीच असलेल्या समस्यांकडे वरिष्ठांना लक्ष द्यावे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला पूर्णवेळ प्राचार्य देण्यात यावे अशी मागणी येथील प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून केली जात आहे