
न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव कडून शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रॊजी राळेगाव तालुक्यातील पौराणिकरित्या प्रसिद्ध असलेल्या रावेरी येथे एकदिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र 2025/26 करिता या एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना राळेगाव शहरापासून अगदी जवळच असणाऱ्या रावेरी येथील प्रसिद्ध रामगंगा नदी,तसेच पौराणिक हेमांडपंथीय वास्तूशिल्प असलेले उत्कृष्ट व प्रसिद्ध असणारे सीतामाता मंदिर, हनुमान मंदिर, तसेच याच परिसरात असणारे निसर्ग उद्यान यासर्वा बद्दल सविस्तर अशी शैक्षणिक माहिती या सहलीत सहभागी विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. शाळेतील या शैक्षणिक सहली करिता येण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामा करिता सकाळी एक सायकल रॅली काढून केली. या शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी शाळेचे पर्यवेक्षक सूचित बेहरे,शिक्षक विनोद चिरडे, मनीषा इखे, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, यांनी पुढाकार घेऊन केला. या एक दिवसीय शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे…
