
। उमरखेड प्रतिनीधी- संजय जाधव-
आज निंगनूर येथील तलवार हल्ल्याने संपूर्ण उमरखेड तालुका हादरून गेला.भर दिवसा येथे मामा-भाच्यावर तलवारी ने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.या प्रकरणात जखमी च्या तक्रारी वरून बिटरगाव पोलिसांनी निंगणुर उपसरपंच पती सह तिघांना अटक केली आहे.
पोलीस स्टेशन बिटरगाव येथे फिर्यादी फारुख खान शाबाद खान वय 37 वर्षे राहणार निगनूर यांनी रिपोर्ट दिला की आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटात सुमारास गावातील उपसरपंच यांचे पती वलीउल्ला खान व त्यांची मुले यांनी गावातील आठवडी बाजारासमोरील रोडवरील फिर्यादीचा याने अतिक्रमण धरल्याचे कारणावरून व फिर्यादी याने माहिती अधिकार ग्रामपंचायतच्या कामकाजाची माहिती मागितल्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा भाचा मतलब खान यांना वलील्ला खान यांनी त्यांचा मुलगा सादिक खान याला फिर्यादी व त्याचा भाचा याला तलवारी जीवेठार मारण्याचे सांगितल्या वरून साजिद खान याने गाडीच्या डिक्कीतून तलवार आणून फिर्यादी याचे पोटावर व त्याचा भाचा मतलब खान याच्या बरगडीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले तसेच त्याचे भाऊ यांनी त्याला मदत केली अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अपराध क्रमांक २१६/२३ कलम ३०७ २९४ १४३ १४४ १४७ १४८ १४९ १०९ आयपीसी सह कलम ४२५शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे 1. वलीउल्ला खान 2. साजिद खान 3. सद्दाम खान 4. राजिक खान कलीम खान या चार आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब व उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात मा ठाणेदार प्रताप बोस पीएसआय कपिल मस्के नापोका मोहन साठे पोलीस कॉन्स्टेबल भालेराव पीसी मुंडे पीसी जाधव व पोलीस स्टेशन बिटरगाव करीत आहे.
