स्व. खुशालराव मानकर ज्युनिअर कॉलेज सावरखेडा येथे सांस्कृतिक महोत्सव

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

स्पंदन 2023 … प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यांने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली. सांस्कृतिक महोत्सवाच्या सत्कारमूर्ती संस्थापिका अध्यक्षा सौ उज्वलाताई अरविंदभाऊ फुटाणे श्री स्वामी समर्थ बहुउद्देशी विकास संस्था कृष्णापुर…, तसेच सचिव अरविंद भाऊ फुटाणे .. उद्घाटक मा. बाळासाहेब इंगोले… प्रमुख पाहुणे.. मोती बाबा पौराते, लेतुजी.जुनघरे, प्रतिष्ठीत नागरिक , तुळशीरामजी उरकुडे, सावरखेड गावातील प्रथम नागरिक उपसरपंच बंडूभाऊ धुळे.. राजूभाऊ मेश्राम, ओम भाऊ फुटाणे.. यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला,. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु संजना गाऊत्रे..कु गायत्री महाजन…रेशम चुधरे हिने केले ‌. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्व. खुशालराव मानकर ज्युनिअर कॉलेज सावरखेडा येथील प्राचार्य लाकडे सर यांनी केले … प्रास्ताविकेमध्ये सावरखेडा या छोट्याशा गावात संस्था अध्यक्षांनी स्वतंत्र ज्युनिअर कॉलेज निर्माण करून आदिवासी उपायोजषण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी विनामूल्य शिक्षणाची दारी खुली करण्यात आली… त्यांच्या अथक प्रयत्नानेच व सावरखेडा गावामधील संपूर्ण शाळेचा अंतर्भाव व्हावा . यासाठी सांस्कृतिक महोत्सव स्पंदन 2023 ची संकल्पना आमच्या संस्थाध्यक्ष च्या विचारातूनच आणि त्यांच्या कार्यातून या कार्यक्रमाची संकल्पना प्रा.लाकडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले आहे. आभार प्रदर्शन कावडे सर यांनी केले ,जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा सावरखेडा… शांता देवी माध्यमिक विद्यालय सावरखेडा… स्व. खुशालराव मानकर ज्युनिअर कॉलेज सावरखेडा… अगंनवाडी केंद्र क्रमांक एक व दोन यांच्या संयुक्त उपक्रमातून हा सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.. जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक सुनील केलाय सर व सहकार्यांनी अथक प्रयत्न करून सांस्कृतिक महोत्सवाला चार चाद लावले.. शांता देवी माध्यमिक विद्यालय सावरखेडा.. पंडित सर ,बोमीनवार सर व मुख्याध्यापक .. दोडके सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले.
एकंदरीत या सांस्कृतिक महोत्सवाला लोकांची जणू काही झुंबडच उडाली संपूर्ण गावाने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला..‌ व आमच्या छोट्याशा इवल्याशा मुला मुलीच्या लहानशा विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांच्या कलागुणांना दाद दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजची शिक्षिका गावंडे मॅडम, महाजन मॅडम, परचाके मॅडम, सय्यद काझी सर, रजनीकांत भाऊ फुटाणे , सुनील भाऊ कांबळे, उमाकांत भाऊ तेलंगे आणि आजी-माजी सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.