
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगाव
निवघा – निवघ्यापासून जवळच असलेल्या मनुला येथे शिक्षज दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनुला (खुर्द) केंद्र तळणी ता हदगाव येथे शिक्षक दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.
आज एक दिवशीय मुख्याध्यापक म्हणून इयत्ता चौथी मधील विद्यार्थी भजरंग कोंडबाराव सुर्यवंशी. तर सहशिक्षक म्हणून आराध्या अनिल शिंदे, तनुश्री शिवचरण शिंदे, करण प्रदिप शिंदे या सर्व विद्यार्थ्यांनी आज शिक्षक दिना निमित्त शाळेचे सकाळी प्रार्थना, मध्यान भोजन व्यवस्था, इयत्ता पहिली ते चौथी पर्यन्त शिकवणी वर्गाचे नियोजन केले होते. त्यांना सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यांनी आपल्या आयुष्यात आपन पण खूप शिकून सर्वोच्च पदावर कार्यरत राहू शकतो हे आज त्यांनी गावाला आपल्या पालकांना तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांना संदेश दिला.
