खैरी (चौरस्ता) ते खैरी गावात जाणाऱ्या रस्त्याचे थांबविलेले काम तात्काळ सुरू करा,(निकृष्ट रस्त्याच्या कामाला जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करण्यासाठी मनसे करणार चक्काजाम)

सहसंपादक: रामभाऊ भोयर

रस्त्याचे काम निकृष्ट केले जात असताना त्यावर कोणताच चकार शब्द न काढता कंत्राटदाराला पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यात येवुन रस्त्याचे थां: बलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगाव अंतर्गत राळेगाव तालुक्यातील खैरी येथे खैरी चौरस्ता ते खैरी गावात जाणाऱ्या सुरू असलेल्या रस्त्याच्या व नालीचे या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या काम करण्यात येत आहे काही काम झाले आहे परंतु कंत्राटदार व संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या मिली भगत मुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक दि 27/5/2024 रोजी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर बांधकाम विभागामार्फत दि 31/5/2024 रोजी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगांव हे त्यांच्या टीम सोबत स्वतः खैरी येथे येऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली व हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे या कामात काय काय त्रुटी आहे याबाबत त्यांनी स्वतः लेखी पत्र दिले त्यानंतर परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि 30/6/2024 रोजी निवेदन देण्यात आले.
सदर कामाची गुणनियंत्रक पथकामार्फत तपासणी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली

आज या घटनेला एक महिना होऊन सुद्धा काहीच कारवाई झाली नाही परंतु अधीक्षक अभियंता कार्यालयाला अहवाल प्राप्त होऊन सुद्धा पुढील कारवाई केली नसल्याची निदर्शनात येत असून येत्या आठ दिवसा सदर कामाचे गुण नियंत्रण पथकामार्फत इन कॅमेरा तपासणी करून सदर दोष पूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करून त्याला कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात येऊ नये
तसेच नागरिकांच्या सेवेसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी रस्ते नाल्या व इतर काम करण्यासाठी देत असते या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले जबाबदार अधिकारी कंत्राटदारांसोबत मिलीभगत करून या निधीवर डोळा ठेवून दर्जा हिन कामे करून शासनाची एक प्रकारे फसवणूकच करत आहेत त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकून शासनाचा अपव्यय झालेला निधी कंत्राटदाराकडून व्याजासह वसूल करावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी त्याचप्रमाणे मनसेच्या निवेदनामुळे आपले पितळ उघडे पडल्याने व कार्यवाहीच्या भीतीने संबंधित काम ठेकेदारांनी बंद ठेवले असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ते काम लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना होणारा त्रास बंद करावा व काम तात्काळ सुरू करावे
अन्यथा येत्या आठ दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार, अनील हमदापुरे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, राळेगाव तालुकाध्यक्ष सुरज लेनगुरे, तालुका उपाध्यक्ष भारत निंबुळकर, खैरी शाखा अध्यक्ष जिवा बुरडकर, संदिप कुटे, गौरव चवरडोल, ओम मडावी, गौरव दरणे, सागर झपाटे, अश्विन ठाकरे, वामन बावणे, अमीत ठाकरे यांच्या सह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.