महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पी.व्ही.वाघमारे कंपनीच्या सेवेतून सेवानिवृत्त



पुरूषोत्तम विठ्ठलराव वाघमारे उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग ढाणकी यांनी गेल्या अनेक वर्षापासून तात्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व आता महावितरण कंपनीची उत्कृष्ट सेवा केली आहे. आळस नावाच्या गोष्टीला त्यांनी आपल्या जीवनात कधीच स्थान दिले नाही. लहान असो की मोठा सर्वांसोबत प्रेमाने राहून त्यांनी सर्वांची मने जिंकली, आपल्या सेवाकाळात कोणाचेही मन दुखावेल असे वर्तन त्यांनी केले नाही. महावितरण कंपनीच्या भल्यासाठी सदोदित प्रयत्न केले, आपल्या सेवेशी प्रामाणिक राहून सेवाकाळ पूर्ण करणे निश्चितच गौरवास्पद असल्याचे मत कार्यकारी अभियंता खान यांनी पी.व्ही.वाघमारे उपकार्यकारी अभियंता यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले.
महावितरण ढाणकी येथे कार्यरत उपकार्यकारी अभियंता पी.व्ही. वाघमारे हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त्त उपविभाग ढाणकी येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी मंचावर सत्कारमूर्ती पी.व्ही.वाघमारे यांचेसह सौ. वाघमारे,उपकार्यकारी अभियंता चव्हाण,उपकार्यकारी अभियंता पवार,सहाय्यक अभियंता डांगे, विराजमान होते. महावितरण कंपनीच्या वतीने मुख्य अभियंता यांचे प्रशस्तीपत्र ,शाल, श्रीफळ ,साडी चोळी देऊन या दांपत्याचा सत्कार करण्यात आला.
१९९९ मध्ये म.रा.विज मंडळ दाभा पहूर येथे रुजू झालेल्या पी.व्ही. वाघमारे यांनी आर्णी,दिग्रस इत्यादी अनेक ठिकाणी महावितरण कंपनीची सेवा केली. सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सहाय्यक अभियंता अतिष चव्हाण,कनिष्ठ अभियंता गेडाम,अनिल सोळंके,चंद्रभान बाभळे,गजानन राचटकर,प्रशांत शिंदे,संजय पडोळे,घुगे, यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला .कार्यक्रमाचे अध्यक्ष खान यांनी उपकार्यकारी अभियंता पी.व्ही. वाघमारे यांनी कृषीपंप विजबिल वसुली मध्ये केलेल्या विशेष कामगीरीचा व नियमित वीज बिल वसुलीचा गौरवपुर्ण उल्लेख केला.सत्काराला उत्तर देताना पी.व्ही.वाघमारे यांनी महावितरण कंपनी प्रति आदर व्यक्त करून त्यांच्या सेवा काळात ज्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला सर्वस्वी रामटेके,शेख मन्नान ,रवी सूर्यवंशी, दवणे, फाळके ,वाठे, गायकवाड, सलीम, मुळे ,महेश चव्हाण,हुसेन,सय्यद,अंजुसिंह मंडम,राठोड मॅडम,इंगळे,नंदनवार,कदम,ईत्यादी सह वितरण केंद्र ढाणकी ,वितरण केंद्र बिटरगाव ,वितरण केंद्र साखरा,वितरण केंद्र दराटी,येथील सर्व कर्मचारी, उपविभाग कार्यालयातील सर्व कर्मचारी, सुरक्षारक्षक, बाह्य स्त्रोत कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रधान यंत्रचालक प्रभाकर दिघेवार यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक लेखापाल येडतकर यांनी केले.