
शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक म्हणून समजले जाणारे सोयाबीन हे सोयाबीन दिवाळी पूर्वी निघत असून या नगदी पिकातून शेतकरी दसरा दिवाळी साजरी करायचे एकरी आठ ते दहा क्विंटल उतारा अपेक्षित असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन काढणीला विलंब झाला असून आता फक्त एकरी दीड ते दोन क्विंटल उतारा येत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे एकरी खर्च सुमारे १५००० अनु उत्पन्न मात्र ७००० ते १०००० हजार रुपये होत आहे त्यामुळे आमदनी अठन्नी खर्चा रुपया असे चित्र तालुक्यात सध्या आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची सर्वाधिक भिस्त निसर्गावर आहे पावसाने योग्य साथ दिली तर पिकाचा उतारा समाधानकारक येतो त्यात पुन्हा चांगला भाव मिळाला की थोडासा आर्थिक आधार मिळतो परंतु गत तीन ते चार वर्षात याचा ताळमेळ बसत नाही दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो यंदा तर अतिवृष्टी ढगफुटीमुळे तालुक्यात अठ्ठावीस हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे पिकांचा उतारा एवढा घसरेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा केली नव्हती त्यातच सध्या भाव मात्र चार ते पाच हजार रुपये पर्यंत असून सोयाबीनचा उत्तरा कमी असल्याने अपेक्षित तेवढे उत्पन्न निघत नसल्याने व एकरी फक्त दीड ते दोन क्विंटल निघत असल्याने शेतकरी हतबल झालाय त्यामुळे आमदानी अठन्नी अन खर्चा रुपया अशी काहीशी गत झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त आहे.
