राळेगाव बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती अरविंद भाऊ वाढोणकर, संचालक अंकुश भाऊ मुनेश्वर यांचा जाहीर सत्कार

सहसंपादक:- रामभाऊ भोयर

राळेगाव येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा वाढोणा (बा) येथिल अरविंद भाऊ वाढोणकर मित्र परिवारातर्फे उपसभापती अरविंद भाऊ वाढोणकर व संचालक अंकुश भाऊ मुनेश्वर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कॉग्रेसचा माध्यमातून राळेगाव बाजार समितीवर संचालकांच्या एकूण १८ जागा पैकी १४ जागा जिंकल्या. विशेष म्हणजे वाढोणा येथुन राळेगाव बाजार समितीवर संचालकपदी पहिल्यांदाच निवडुन येण्याचा मान अरविंद भाऊ वाढोणकर यांनी मिळविला आहे.
या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे संचालन शेर अली बापु लालाणी यांनी केले तर आभार अंकुश भाऊ मुनेश्वर यांनी मानले.

या कार्यक्रमाला मनोहर गुडघे, शेर अली लालाणी, निळकंठ राव हांडे, विनोद मांडवकर ,रहीम भाई , उपसरपंच वाढोणा देवतळे , दिगंबर राव कागदकर , सुनील शेळके संदीप देऊळकर, निलेश ठाकरे, अरुण निकोडे , रवि देशमुख, परेश देशमुख, प्रकाश पोपट, पुरुषोत्तम चिडे, बंडु गेडेकार, अजमुद्दिन भाई, भास्करराव मानकर, सरपंच करंजी प्रसाद ठाकरे, गजानन राऊत, महादेवराव सुरणकर, अजय पिंपळे, राहुल झोटिंग, कवडू कांबळे, वासुदेव निशाने, विद्याधर निशाने, सतीश जाधव, अरविंद फुटाणे, पिंपळगाव चे माजी सरपंच किशोर धामंडे यांच्या सह वाढोणा (बा) परिसरातील असंख्य कार्यकर्ते काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होते.