जागतिक दिव्यांग दिना निमित्य दि. 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत स्थानिक मधुकरराव नाईक निवासी मूक बधिर विद्यालय ढाणकी येथे क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आज दि.7 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थींना प्रशस्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंटी भाऊ जाधव (शिवसेना शहर अध्यक्ष ढाणकी ) हे तर प्रमुख अतिथी आदित्य राठोड ( ईजी. रिट्कॉन कॉन्ट्रॅक्शन ढाणकी ). विशाल नरवाडे, डाँ दिनेश जयस्वाल,अनिकेत राठोड, वानखेडे हे होते. सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दिव्यांगच्या उद्धार कर्त्या हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर विजयी विद्यार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. के भोने सर , एम. एन. राठोड सर, श्री आडे सर व सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राथमिक वयोगटासाठी कला शिक्षिका कु. दर्शना पवार मॅडम तर माध्यमिक वयोगटासाठी कला शिक्षक . एस. व्ही. चव्हाण सर हे होते तर निरीक्षक म्हणून दोन्ही गटा साठी ,कानडे सर, कु. महाजन मॅडम, पागिरे सर, रावते सर हे होते.या कार्यक्रमा चे प्रास्ताविक ए. एन आढावे सर यांनी केले असून संचालन एस. व्ही. चव्हाण सर यांनी केले व आभार प्रदर्शन जी. बी. रावते सर यांनी मानले.
मधुकरराव नाईक निवासी मूक बधिर विद्यालय ढाणकी येथे बक्षीस वितरण
- Post author:lkhtpt
- Post published:December 11, 2022
- Post category:Uncategorized
