
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
आज रोजी राळेगाव शहरात बाजाराचा दिवस असल्याने मा.पो.नी.संजय चोबे साहेब यांचे आदेशाने आज दी.02/09/2022 रोजी पो.हे.काँ गोपाल वास्टर ,ना.पो.काँ सुरज चिवाने, होमगार्ड प्रफ्फुल नागोसे,संदीप चापले असे बाजार बंदोबस्तमध्ये पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन खबर मिळाली की, यवतमाळ अर्बन बैंक चे बाजुला सार्वजनीक ठिकाणी नामे निलेश माधवराव खुडसंगे वय 41वर्ष रा.रामनगर राळेगांव हा लोकांन कडुन पैसै घेवुन त्यांना वरळी मटका आकडे लीहीलेल्या चिठ्या देवुन पैसै हारजितचा खेळ खेळतांना मिळुन आला त्याचे अंगझङतीमध्ये वरळी मटका साहित्य व नगदी 850 रु.व एक मोबाईल असा ऐकुण 5870 रु.चा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला सदर मटकाचा मालक ईम्राण अजीज कुरेशी रा.राळेगांव हाअसल्ल्याचे आरोपीने सांगीतले वरुन दोन्ही आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही मा.पो नी.साहेब यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. या पूर्वी सुधा विविध वृत्तपत्रांमधून राळेगाव शहरात सुर असलेल्या अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे म्हणून परंतु त्यावर दुर्लक्ष केल्या जात असल्याने व आज केलेली कारवाई त्या मुळे शहरात राळेगाव पोलीस स्टेशन ची वाहवा करण्यात येत आहे.
