ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली केव्हा होणार
नागरिकांचा सवाल
संवर्ग विकास अधिकाऱ्याला पडला विसर

वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी हे गाव सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या तीन हजार आहेत. गावातील नागरिकांना विविध कामासाठी ग्रामपंचायत जावे लागते मात्र येथील नशेखोर ग्रामविकास अधिकारी याच्या मुळे गावातील विकास कामांना खिळ बसलेली आहे. तेव्हा या मुजोर ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी नागरिकांनी संवर्ग विकास अधिकाऱ्याला निवेदन दिलेले आहे.
ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी गणेश मुकाडे याचा उद्धट व उर्मट वागणुकीमुळे गावातील जनता त्रासून गेलेली आहे. ग्रामपंचायत मध्ये गेले असता गैरहजर राहत असून ग्रामपंचायती द्वारे साजऱ्या करण्यात येणाऱ्या शासकीय राष्ट्रीय कार्यक्रमाला सुट्टी मारणे , नागरिकांना शासकीय कामासाठी अडवून मिळणाऱ्या योजनेपासून वंचित ठेवणे, विवाह नोंदणीचे पैसे घेऊन देणगी पावती न देता गावातील रोजगार महिलांची उद्धटपणे वागणूक करणे एवढेच नव्हे तर कार्यालयीन वेळेमध्ये हा ग्राम विकास अधिकारी नशा करून येत असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. नागरिकांनी या ग्रामविकास अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यासंदर्भात पंचायत समिती वरोरा येथे जाऊन संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र याचा कोणताही उपयोग न झाल्याने कर्तव्यामध्ये व्यस्त असणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्याला दि. 9 ऑक्टोंबर ला नागरिकांद्वारे स्मरणपत्र देण्यात आले. मात्र या स्मरण पत्राचा विसर अधिकाऱ्यांना झाला की काय म्हणून या ग्रामविकास अधिकाऱ्याची दादागिरी वाढली असून आता तर नागरिकांना शासकीय कामात अडथळा केला अशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याची आणि खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकीही देण्याची हिम्मत वाढलेली आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकारी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करतील काय व या हेकेखोर उर्मट लोकसेवकावर करवाही करतील का? असा प्रश्न उपस्थित निर्माण झालेला आहे. नागरिक आपल्या उर्वरित कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यास घाबरत असल्याने या अधिकाऱ्याची त्वरित बदली करण्याची मागणी चिकणी वासियानी निवेदनातून केली आहे.