
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व त्रस्त नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी किशोरभाऊ तिवारी यांचा दौरा-आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या घरी भेट देणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
प्रशासकीय उदासीनतेचा कळस ग्रामीण भागात गाठला असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडुन अध्यक्ष किशोरभाऊ तिवारी यांचा दिनांक १३ सप्टेंबर रोजी दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यात ते नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणार आहे. याव्यतिरीक्त आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या घरी भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर व कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडुन वारंवार सूचना दिल्यांनतरही अधिकारी कर्मचारी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या घरी वा ग्रामीण भागात ग्राम सेवक गावात जात नसल्याच्या तक्रारीचा पाऊस पडल्यांनंतर आपण सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम पुन्हा सुरु करीत असुन अशा मस्तवाल व भ्रष्ट्र नोकरशाही विरुद्ध आता एल्गार उठविण्याची वेळ आली असल्यामुळे अशा कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्यासाठीच हा दौरा असल्याची माहीती किशोरभाऊ तिवारी यांनी यावेळी दिली .
दिनांक १३ सप्टेंबर ला दुपारी १ वाजता वडकी येथे शेतकरी आत्महत्या केलेल्या कुंटुबाला भेट देणार आहे. उषाताई भाऊराव खोंडे यांचा मुलगा विशाल भाऊराव खोंडे वय ३५ यांनी दिनाक १ सप्टेबंरला वडकी येथे गळफास घेउन आत्महत्या केली होती. त्याला लहान मुलगा पत्नी आई असा परिवार आहे. या परीवाराला धीर देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी भेट देण्यात येणार आहे. वास्तविक शेतकरी आत्महत्या झाल्यास जिल्हाधिकारी अथवा तत्सम अधिका-याने भेट देऊन सरकारला माहिती देण्याचे आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र कुठलाच अधिकारी भेट देत नसल्याचे आढळून आल्याने हा गंभीर विषय असल्याचे किशोरभाऊ तिवारी यांनी म्हटले आहे.
या भेटीनंतर दुपारी २ वाजता ज्या पिंपरी गाडेघाट ह्या खेड्यात ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकारी एका वर्षापासुन गेला नाही त्या खेड्यातील आदिवासी नागरिकांची भेट घेऊन अन्नसुरक्षा, खावटी वाटप, तेंदू पत्ता बोनस वाटप, रस्ता वीज पाणी जाती प्रमाणपत्र आरोग्य व ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसोबत समस्या जाणुन उपाय योजना करण्यासाठी सरकार आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी ४ वाजता झरी तालुक्यातील पाटण येथे डॉ राजेश अडपावार यांचेघरी भेट सुध्दा देणार आहे. झरी तालुक्यातील रेती माफिया, दारु माफिया, अन्न माफिया, व गाई ची अवैध वाहतूक मोठया प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी आल्या आहे. त्याअनुषंगाने संबंधीत अधिका-यांची बैठक तसेच तक्रारीची शहानिशा व महसूल अधिकारी यांच्या सहभागाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी व कारवाईचा अहवाल देण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर किशोरभाऊ तिवारी हे रात्री पांढरकवडा येथे मुक्काम करणार आहे.
